रुबाई क्रमांक ८
थोरवी न कुठचीही, ना गाठले शिखर यशांचे
नसतात कधी शत्रू आम्हा साध्या माणसांचे
हे रक्तबंबाळ हृदय, ह्या चिघळणाऱ्या जखमा
हे तर उपकार सारे माझ्या आप्तस्वकियांचे
उर्दू अनुवाद :
न यक्ता न दान:, न पाए मुक़ाम सितारोंके
होते नहीं दुश्मन कोई, मुझ जैसे इंसानोंके
यह दिल-ए-बिस्मिल, यह नासूर बेशुमार
बस एहसान है, यह तो सारे, मेरे अपनोंके