Sunday, September 8, 2019

Rubaai 12, 13 and 14


रुबाई क्रमांक १२


रुबाई साठी कुठचाही विषय वर्जित नाही. 
प्रार्थना सुद्धा ह्या बांधणीत लिहिता येते. 


रे बघ ना मी किती सोसल्या झळा 
दे छोटासा तरी मेघ सावळा 
तव करुणेचे, पुरे दोन थेंबही 
करण्यासी आतला गंध मोकळा


कधी कधी मला व्याकरणा बद्दल प्रश्न विचारले जातात, म्हणून ही थोडी तांत्रिक माहिती. 
ह्या रुबाईत, प्रत्येक ओळीत १९ मात्रा आहेत.
गट ८ + ८ + ३. 
लगावली :  (गा गा गा गा) (ल गा गा ल गा) (ल गा)
असे वृत्त आहे कि नाही, ते मला माहीत नाही :-)    
मला जे सुचलं आणि जमलं ते मी लिहिलं. 


नोव्हेंबर ४, २०१८

Loose translation :
Haven’t I suffered enough scorching heat, take a look at me
At least now, even if it’s tiny, please send a gray cloud for me, 
Just a few droplets of your kindness are more than enough
To unlock the fragrance that’s waiting inside me



रुबाई क्रमांक १३

किस्सा तो रांझाचा, मजनूचा अन फरहादचा 
हा जीवनत्यागाचा कसला रे आदर्श तुमचा
सोशित अखंड विरह कसा जीवित मी आहे पहा
विसरा त्यांना, आता गझला, माझ्यावरती रचा 
Loose translation
All these stories of Raanjha, Majanu and Farhad Why do you idolize the idea of giving up on life See how I live through the endless suffering of seperation So forget them and start composing Ghazals on me

२ डिसेंबर २०१८



रुबाई क्रमांक १४

The anti-Valentine ;-)

नको बाळगू मिजास वृथा, गर्व अथवा सौंदर्याचा
दोष होता नक्कीच सगळा, त्या कोवळ्या माझ्या वयाचा
होते सहज शक्य राहणे, पाषाणासम स्तब्ध निर्मम
तरी मेणापरी वितळण्याचा, गं हट्टच होता कविमनाचा 

Loose translation
No need to get too smug, or too proud of your beauty The blame surely lies all with my immature adolescence It was easily possible to stay unaffected like a statue But to melt like a candle was the command from the poet’s heart

१४ फेब्रुवारी २०१९

No comments:

Post a Comment

Related Posts Plugin for WordPress, Blogger...