Wednesday, October 6, 2021

कशाचा कशाचा मला राग आहे

 कशाचा कशाचा मला राग आहे 


धरावे सदा का तुझे हात दोन्ही 

तुझ्या कंकणांचा मला राग आहे


कसा रोज न्याहाळतो हा तुला गं 

तुझ्या आरशाचा मला राग आहे 


कटी भोवती मेखला घट्ट का ही 

तिच्या ह्या मिठीचा मला राग आहे


तुझे ओठ स्पर्शून जातो कितीदा 

चहाच्या कपाचा मला राग आहे 


- अभय अवचट 

October 6, 2021


1 comment:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...